गोवा, 27 नोव्हेंबर 2026
चित्रपट ही एक वैश्विक भाषा आहे, जी कथा, भावना आणि अनुभवांच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणते. कित्येक जण चित्रपटांची जादू प्रभावी दृश्ये आणि शब्दात व्यक्त न करता येणाऱ्या भावनांमधून घेत असतात मात्र हे न दिसणारे क्षणही प्रेक्षकांमधील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यातच खरी समावेशकता दडलेली आहे. याच समावेशकतेचे तत्त्व पुढे नेत 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फी मध्ये इंडियन पॅनोरमा अंतर्गत हा सिनेमॅटिक अनुभव विशेष गरजा असलेल्या विविध प्रकारच्या प्रेक्षकांना दिला जात आहे.
सिनेडब्स च्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात असून INOX-2 मध्ये प्रदर्शित केल्या जाणाऱ्या निवडक 25 चित्रपटांना ऑडिओ डिस्क्रिप्शन आणि कॅप्शन अर्थात लिखित मथळ्यांची सुविधा दिली जात आहे. यामुळे दृष्टिबाधित आणि श्रवणदोष असलेल्या प्रेक्षकांना देखील या कथांचा आनंद रोचकपणे आणि अर्थपूर्ण पद्धतीने घेणे शक्य झाले आहे. विशेष प्रकारच्या गरजा असलेल्या प्रेक्षकांना देखील या महोत्सवाचा आनंद घेता यावा या दृष्टीने इफ्फी करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
57 वा इफ्फी 'सबका मनोरंजन' (सर्वांसाठी मनोरंजन) या संकल्पनेचा अभिमानाने पुरस्कार करतो आणि विविधता, सुलभता आणि सर्वसमावेशकता यांचा उत्सव साजरा करणारा महोत्सव साकारण्यासाठी नवनवीन प्रयोग करत आहे. या संकल्पनेला प्रत्यक्षात साकारण्यासाठी ‘सिनेडब्स’ या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांच्या वैयक्तिक स्मार्टफोनवर ऑडिओ डिस्क्रिप्शन आणि क्लोज्ड कॅप्शनची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान हेडफोन्सचा वापर करून प्रेक्षक या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक चित्रपटरसिकाला कोणत्याही अडथळ्याविना चित्रपटाचा आनंद घेता येत असून, सिनेमा हा सर्वांसाठी समान आणि सामायिक अनुभव ठरत आहे.
ही दरी भरून काढत, पडद्यावर काय घडतेय याच्या श्राव्य स्वरुपातील वर्णनाच्या अर्थात ऑडिओ डिस्क्रीप्शनच्या सुविधेद्वारे चित्रपटातील कृती, पार्श्वभूमी, चेहऱ्यावरील हावभाव आणि संवादातून समजून घेता न येणाऱ्या इतर महत्त्वाच्या दृश्य तपशीलांचे निवेदन केले जाते. दरम्यान, संवाद, ध्वनीच्या सहाय्याने साधलेला प्रभाव आणि इतर संबंधित ध्वनी संकेतांचे पडद्यावर लिखित स्वरूपात सादरीकरणाच्या माध्यमातून पडद्यावर दिसणाऱ्या चित्रणाचे श्राव्य अनुभव देणाऱ्या म्हणजेच संवादांसोबतच पार्श्वसंगीताचे आणि इतर ध्वनींचेही पडद्यावर उमटणारे लेखी वर्णन यामुळे अर्थात क्लोज्ड कॅप्शन्सच्या सुविधेमुळे कर्णबधिर व्यक्तींसाठी चित्रपट पाहणे अधिक सुलभ प्रक्रिया झाली आहे.
महत्वाचे म्हणजे या सुविधा नियमित प्रदर्शनासोबतच समांतरपणे सुरु असतात. त्यामुळे, एकत्रित चित्रपट पाहण्याच्या अनुभवात कोणताही अडथळा न येता प्रेक्षकांना त्यावेळीच चित्रपटाचा आस्वाद घेता येतो. या उपक्रमाच्या माध्यमातून, 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमधील भारतीय पॅनोरमा विभागाअंतर्गत, सुलभ वावरतेशी निगडीत गरजांचा विचार न करता प्रत्येकाला सिनेमाची जादू अनुभवता यावी, यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.
या उपक्रमांतर्गत प्रदर्शित होणारे 25 निवडक कथात्मक चित्रपट (फीचर फिल्म्स) आहेत:
- धुरंधर
- उरुम
- थाई किझावी
- रुबी-क्यूब
- बनारस
- सूर्यमुखी
- सिंग गीतम
- ओह माय डॉग
- पगला घोडा
- आदि अनंत
- लालो - कृष्ण सदा सहायते
- द ग्रेट ग्रँड सुपरहिरो एलियन्स का आगमन
- बाप्या
- देऊळ बंद 2
- कृष्णावतारम
- मन शंकर वर प्रसाद गारू (पंडग की वस्तुन्नारू)
- स्क्रोल
- कबीर सर का आखरी लेसन
- प्रत्याबर्तन
- हनुमान अंश
- सेव्ह मिक्चर
- स्लेज
- द केरला स्टोरी 2 गोज बियॉन्ड
- चेन्नई लव्ह स्टोरी
- तिघी


या चित्रपट प्रदर्शनामध्ये वावर सुलभतेशी संबंधित सोयी सुविधांचा अंतर्भाव केला गेला आहे. हा पुढाकार म्हणजे ज्ञानेंद्रियांशी संबंधित मर्यादांमुळे प्रेक्षकांना सिनेमाच्या कलेचा आनंद घेण्यापासून वंचित राहावे लागू नये, याची सुनिश्चिती करण्याचा भारतीय पॅनोरमा विभागाचा प्रयत्न आहे. हा उपक्रम भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 च्या सीमाविरहित कथा या संकल्पनेशी सुसंगत उपक्रम ठरला आहे. यातून परस्परांमधील वेगळेपणाच्या पलीकडे जाऊन लोकांना जोडण्याच्या सिनेमाच्या क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/भक्ती सोनटक्के/तुषार पवार/दर्शना राणे