Posted On:
23 NOV 2026 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, गुरु तेग बहादूर जी यांच्या शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात म्हटले आहे :
“गुरु तेग बहादूर जी यांच्या शहीद दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते.
गुरु तेग बहादूरजी यांचे जीवन आध्यात्मिक भक्ती, त्याग, करुणा आणि अदम्य धैर्याचा अद्वितीय आदर्श आहे. त्यांनी नेहमीच सत्य, न्याय आणि मानवतेच्या मूल्यांचे रक्षण केले. लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आली, तेव्हा त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. त्यांचा हा त्याग मानवी प्रतिष्ठा आणि इतरांच्या हक्कांविषयीच्या आदराचे प्रतीक आहे.
त्यांचे जीवन आपल्याला अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याची, सर्व धर्मांचा आदर करण्याची आणि समाजात प्रेम, बंधुभाव आणि सलोखा वाढवण्याची प्रेरणा देत राहील.
चला, त्यांचे आदर्श, आचरणात आणण्याचा संकल्प करूया आणि स्वातंत्र्य, समता आणि परस्पर आदर या मूल्यांवर आधारित समाज घडवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया.”
सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai