पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मनिला येथे आसियान शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मनिला येथे 23 व्या भारत-आसियान शिखर परिषद आणि 21व्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या निमित्ताने सिंगापूरचे पंतप्रधान महामहिम लॉरेन्स वोंग यांची भेट घेतली.

Posted On: 17 NOV 2026 4:00PM by PIB Mumbai

उभय नेत्यांनी सप्टेंबर  2025 मधील पंतप्रधान वोंग यांच्या भारत भेटीदरम्यान स्वीकारलेल्या 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीसाठी मार्गदर्शक आराखडा ' अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, आर्थिक सहकार्य, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन, शाश्वतता, संपर्क व्यवस्था ,आरोग्यसेवा व वैद्यकीय क्षेत्र, संरक्षण व सुरक्षा सहकार्य, आणि लोकांमधील आदानप्रदान  व सांस्कृतिक देवाणघेवाण अशा आठ प्राधान्य क्षेत्रांमधील पुढील वाटचालीबाबत चर्चा केली. तसेच  प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही त्यांनी विचारांचे आदान-प्रदान केले.

पंतप्रधानांनी सिंगापूरच्या आगामी  'आसियान'  अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या आणि या अध्यक्षपदाच्या यशस्वी वाटचालीला भारताचा पूर्ण सहयोग राहील असे आश्वासन पंतप्रधान वोंग यांना दिले.


***


Nilima Chitale / Sushma Kane / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2337636) अभ्यागत कक्ष : 12