पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नेहमी उदात्त आणि सकारात्मक कर्मे करण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिक

Posted On: 16 NOV 2026 8:53AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. कोणताही मनुष्य एका क्षणासाठीही कर्म न करता राहू शकत नाही आणि म्हणूनच, प्रत्येकाने आपले जीवन नेहमी उदात्त आणि सकारात्मक कर्मांमध्ये व्यतीत केले पाहिजे, असा संदेश या सुभाषितातून देण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले आहे;

"न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्।

कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः॥"

या सृष्टीतील कोणताही मनुष्य एका क्षणासाठीही कर्म न करता राहू शकत नाही. प्रत्येकजण निसर्गातून मिळालेले अंगभूत गुण आणि स्वतःच्या स्वभावामुळे सतत कर्म करण्यास प्रवृत्त असतो; म्हणूनच, आपण आपले जीवन नेहमी उदात्त आणि सकारात्मक कर्मे करण्यात व्यतीत केले पाहिजे”.

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्। कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः॥

***

NitinFullluke / ShradhhaMukhedkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2336768) अभ्यागत कक्ष : 15