57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ('इफ्फी)  'इंडियन पॅनोरमा' विभागाअंतर्गत 25 कथात्मक आणि 20 कथाबाह्य चित्रपट दाखवले जाणार


सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शक पुरस्कारासाठी पाच चित्रपटांचे नामांकन; सर्वोत्कृष्ट वेब मालिका (ओटीटी) पुरस्कारासाठी पाच वेब मालिका नामांकित

उद्घाटनीय चित्रपट म्हणून 'धुरंधर' (हिंदी) आणि 'बिकमिंग' (लडाखी) या चित्रपटांची निवड

Posted On: 14 NOV 2026 5:24PMby PIB MumbaiRelease ID: 2336341Views: 34

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI - International Film Festival of India) एक प्रमुख विभाग असलेल्या 'इंडियन पॅनोरमा' या विभागात 2026 च्या आयोजनाअंतर्गत 25 कथात्मक (फीचर) चित्रपट आणि 20 कथाबाह्य (नॉन फीचर) चित्रपट दाखवले जाणार आहेत. या 25 कथात्मक चित्रपटांमध्ये मुख्य प्रवाहातील चित्रपट विभागातील पाच चित्रपटांचा समावेश आहे. 'इंडियन पॅनोरमा 2026' चा उद्घाटनीय कथात्मक चित्रपट म्हणून आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' (हिंदी) या चित्रपटाची निवड झाली आहे. तर लीना यादव दिग्दर्शित 'बिकमिंग' (लडाखी) या चित्रपटाची उद्घाटनीय कथाबाह्य चित्रपट म्हणून निवड करण्यात आली आहे.

यंदा या विभागासाठी 404 समकालीन भारतीय कथात्मक चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून या कथात्मक चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. तर कथाबाह्य चित्रपटांसाठी आलेल्या 358 प्रवेशिकांमधून 20 चित्रपटांची निवड केली गेली. या निवड झालेल्या चित्रपटांच्या माध्यमातून यंदाच्या महोत्सवात कथात्मक आणि कथाबाह्य प्रकारांतील तसेच अनेक भाषांमधील समकालीन भारतीय चित्रपटनिर्मितीचे व्यापक विश्व खुले होणार आहे. चित्रपट कलेच्या प्रसारासाठी सिनेमॅटिक, संकल्पना आणि सौंदर्यदृष्टीच्या पातळीवर असलेल्या कथात्मक आणि कथाबाह्य चित्रपटांची निवड करणे, हे इंडियन पॅनोरमाचे उद्दिष्ट आहे. कथात्मक आणि कथाबाह्य चित्रपटांसाठी नेमलेल्या स्वतंत्र परीक्षक मंडळांमार्फत त्यांच्या संबंधित अध्यक्षांच्या नेतृत्वात ही निवड केली जाते.

भारतीय चित्रपटसृष्टीतील नवे दृष्टिकोन, अभिव्यक्तीमधील अभिनवता आणि नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे, हा भारतीय कथात्मक चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शक पुरस्कारामागचा उद्देश आहे.

इंडियन पॅनोरमा 2026 साठी निवडलेले 25 कथात्मक चित्रपट

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते मधुर भांडारकर यांच्या अध्यक्षतेखालील 12 सदस्यांच्या कथात्मक चित्रपट परीक्षक मंडळाने ही निवड केली आहे. निवडलेल्या कथात्मक चित्रपटांमध्ये इंडियन पॅनोरमा कथात्मक चित्रपट विभागातील 20 चित्रपटांचा आणि मुख्य प्रवाहातील चित्रपट विभागाअंतर्गतच्या पाच चित्रपटांचा समावेश आहे.

क्र.

चित्रपटाचे नाव

भाषा

दिग्दर्शक

1

पारो - द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राइड स्लेव्हरी

हिंदी

गजेंद्र अहिरे

2

लालो - कृष्ण सदा सहायते

गुजराती

अंकित भूपतभाई सखिया

3

द केरला स्टोरी 2 गोज बियॉन्ड

हिंदी

कामाख्या नारायण सिंह

4

कृष्णावतारम

हिंदी

हार्दिक गज्जर

5

बर्ड्स ऑन आइस

लडाखी

साहिल शाह

6

स्क्रोल

तमिळ

कन्नन एस

7

पागला घोडा

बंगाली

शेखर दास

8

आदि अनंत

मराठी

महेश लिमये (ऊर्फ शिवकुमार लिमये)

9

उरुम

न्यिशी

दुयू ताब्यो

10

बनारस

हिंदी

भारतबाला गणपती

11

कबीर सर का आखरी लेसन

हिंदी

सरफराज

12

सिंग गीथम

तेलुगू

सिंगीथम श्रीनिवास राव

13

ओह माय डॉग

हिंदी

अमित राय

14

रुबी-क्यूब

कन्नड

पी. शेषाद्री

15

सेव मिक्चर

हिंदी

मुस्कान अस्थाना

16

पिली चन्ने

तुळू

अनुपमा शरधी

17

द ग्रेट ग्रँड सुपरहिरो एलियन्स का आगमन

हिंदी

मनीष सैनी

18

थाई किझावी

तमिळ

शिवकुमार मुरुगेसन

19

सूर्ज्यमुखी

आसामी

अंतरा जी. जी. चौधरी

20

सर्वम माया

मल्याळम

अखिल सत्यन

मुख्य प्रवाहातील चित्रपट विभाग

क्र.

चित्रपटाचे शीर्षक

भाषा

दिग्दर्शक

21

कांतारा:  अ लेजेंड चॅप्टर 1

कन्नड

रिषभ शेट्टी

22

बाप्या

मराठी

समीर तिवारी

23

मना शंकरा वर प्रसाद गारू (पंडागा की वस्तुन्नारु)

तेलगू

अनिल रवीपुडि 

24

धुरंधर

हिंदी

आदित्य धर

25

देऊळबंद 2

मराठी

प्रविण विठ्ठल तरडे

भारतीय  कथात्मक  चित्रपटांसाठी  सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कारासाठी नामांकनं

कथात्मक चित्रपटांच्या  ज्युरीने 'सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक' पुरस्कारासाठी खालील पाच चित्रपटांची निवड केली आहे:

क्र.

 चित्रपटाचे मूळ शीर्षक

भाषा

दिग्दर्शक

1

चेन्नई लव्ह स्टोरी

तेलगू

रवि वर्मा नांबुरी

2

प्रत्यवर्तन 

बंगाली

समर्पण सेनगुप्ता

3

तिघी

मराठी

     जिजीविषा काळे  

4

स्लेज    

काश्मिरी

राजा शब्बीर मोहम्मद खान

5

हनुमान अंश

हिंदी

डॉ.विशाल चर्तुर्वेदी

'इंडियन पॅनोरमा 2026  साठी निवडलेले 20 कथाबाह्य चित्रपट

सहा सदस्यांच्या कथाबाह्य चित्रपटांच्या ज्युरीचे नेतृत्व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि शिक्षणतज्ज्ञ हिमांशू शेखर खटुआ यांनी केले. एकूण 358 समकालीन भारतीय कथाबाह्य चित्रपटांच्या प्रवेशिकांमधून 20 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट उदयोन्मुख आणि प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांची समकालीन भारतीय मूल्यांचे दस्तऐवजीकरण करण्याची, त्याबाबत शोध घेण्याची, मनोरंजन करण्याची आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची क्षमता दर्शवतात.

 

क्र.

चित्रपटाचे शीर्षक 

भाषा 

दिग्दर्शक 

1

द अनसीन होली रिव्हर - सरस्वती 

हिंदी

भास्कर विश्वनाथन

2

बिकमिंग

लडाखी

लिना यादव

3

शत-शत अटल

हिंदी

अतुल पांडे

4

द हग ऑफ एम्प्टीनेस

कन्नड

प्रदिप कुमार शेट्टी के

5

रेड कार्पेट

असामी

आयमी बरुहा

6

डेमोग्राफी इज डेस्टिनी

    हिंदी

कामाख्या नारायण सिंग; अंशुमन शेखर

7

इकोज ऑफ द लास्ट शेल्टर

हिंदी

भरत अरोरा; राजेश भाटिया

8

विन

तेलगू

प्रविण

9

उलिद्दु संपीगे मात्रा

कन्नड

अभिषेक

10

निर्मांजली: द चंदिगड ऑफ मॅसीज नोविकी  

इंग्रजी

सुरज कुमार

11

शिक्षा

मराठी

अमित पाटकर

12

नक्श – ए दौर

काश्मिरी

बाबा तस्दुक हुसेन

13

चांदोबा

मराठी

निपुण धर्माधिकारी

14

आभाळवृक्ष

मराठी

संतोष डावखर

15

अट्टपडी

तमिळ

विजीष मणि

16

सेव्ह द गॉड

हिंदी

निरज कुमार मिश्रा

17

अमित अटल

हिंदी

हितेष शंकर

18

स्विच ऑफ

मल्याळम

संदिप फ्रान्सिस

19

चलो इंडियन विथ एरिक जी मिझोराम

इंग्रजी

राजदीप चौधरी

20

कथार कथा बंगाली धृतीश्री सरकार

बंगाली

धृतीश्री सरकार

इफ्फी च्या छत्राखाली 1978 मध्ये सादर करण्यात आलेला, इंडियन पॅनोरमा भारतीय चित्रपट आणि देशाच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचा सिनेमा कलेच्या माध्यमातून प्रचार करतो. हे वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आणि ना-नफा स्क्रीनिंगद्वारे चित्रपट कलेचा प्रचार करण्यासाठी समर्पित आहे. IFFI मध्ये त्यांच्या स्क्रिनिंगच्या पलीकडे, निवडक चित्रपट भारतातील आणि परदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये, द्विपक्षीय सांस्कृतिक विनिमय कार्यक्रमांतर्गत आयोजित भारतीय चित्रपट सप्ताह, सांस्कृतिक देवाणघेवाण प्रोटोकॉलच्या बाहेर विशेष भारतीय चित्रपट महोत्सव आणि भारतातील विशेष भारतीय पॅनोरमा महोत्सवांमध्ये सादर केले जाऊ शकतात.

***

आशिष सांगळे/तुषार पवार/राजेश शिरभाते/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2336341
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026