Posted On:
14 NOV 2026 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली: 14 नोव्हेंबर 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी छठ पूजेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे,“श्रद्धा आणि सूर्योपासनेचा सण असलेल्या या ‘छठ’च्या मंगल पर्वानिमित्त, भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.”
हा सण सूर्यदेव आणि छठी मैया यांच्यावरील अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. चार दिवस चालणारा हा उत्सव भक्ती, संयम आणि समर्पण या माध्यमातून आपल्या सांस्कृतिक परंपरांची महत्ता अधोरेखित करतो. छठ पूजेच्या काळात, भाविक सूर्यदेवतेला 'अर्घ्य' अर्पण करून आपल्या कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात. हा सण आपल्याला निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पर्यावरणाचे जतन करण्याची प्रेरणा देतो.
हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि शांतता घेऊन येवो, तसेच समाजात प्रेम आणि सलोखा वाढीस लागो. या निमित्ताने, नद्या आणि इतर जलस्रोतांचे रक्षण आणि जतन करण्याची आपली जबाबदारी निभावण्याचा संकल्प करूया.
***
राधिका अघोर/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai