युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माय भारत यांच्या वतीने- ‘विकसित भारत युवा संवाद: आपले मत ओळखा’ ही मोहीम साजरी, 31 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 536 कार्यक्रमांच्या माध्यमातून 1 लाखांहून अधिक तरुणांपर्यंत झाला प्रसार.


थेट संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून या मोहिमेद्वारे निवडणुकीविषयी जागरूकता, माहितीपूर्ण मतदान आणि जबाबदार लोकशाही सहभागाला मिळाले प्रोत्साहन

Posted On: 06 NOV 2026 8:45AM by PIB Mumbai

युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 'मेरा युवा भारत' (MY Bharat) या माध्यमातून आयोजित केलेली देशव्यापी मोहीम 'विकसित भारत युवा संवाद: आपले मत ओळखा' या मोहीमेची गुरुवारी सांगता झाली. या मोहिमेअंतर्गत 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 536 युवा संवाद आयोजित करण्यात आले, ज्याद्वारे 1,00,493 तरुणांपर्यंत पोहोचता आले; तसेच 536 युथ आयकॉन्स' यात सहभागी झाले होते. या मोहिमेअंतर्गत देशभरातील महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या जागृतीवर चर्चासत्रे आयोजित केली होती, आणि तरुणांना, विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना, त्यांचा मतदानाचे हक्क व निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यास आणि लोकशाहीत जबाबदारीने सहभागी होण्यास प्रोत्साहित केले.

दिनांक 26.10.2026 ते 05.11.2026, या कालावधीत आयोजित केलेल्या या मोहिमेचा उद्देश देशभरातील 500 विद्यापीठे, महाविद्यालये आणि संस्थांपर्यंत सहजगत्या पोहोचणे हा होता. समारोपाच्या दिवशी, 28 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 123 युवा संवादांचे आयोजन करण्यात आले, ज्यात 22,588 युवक आणि 123 युथ आयकॉन्सनी सहभाग घेतला.

या मोहिमेत राज्यपाल, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवला . पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया आणि नागालँडचे राज्यपाल नंद किशोर यादव यांनी अनुक्रमे चंदीगड आणि दिमापूर येथील कार्यक्रमांना हजेरी लावली. दिल्लीत, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल आणि नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चौधरी धरमबीर सिंग, प्रधान बरुआ, रणजीत दत्ता, रूपकुमारी चौधरी आणि महेश कश्यप यांच्यासह अनेक खासदारांनीही विविध राज्यांमधील कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला‌ होता.

क्रीडा क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व आणि  युवावर्ग आदर्श व्यक्तींनीही अनेक राज्यांमधील कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, आपले अनुभव सांगितले आणि तरुणांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.पंजाबमध्ये, आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू  अमनदीप कौर यांनी त्यांच्या क्रीडा प्रवासाविषयी आणि शिस्त व आत्मविश्वास निर्माण करण्यात खेळाच्या भूमिकेबद्दल सांगितले, तर रोइंगचे क्रीडा आयकॉन  कुलविंदर सिंग यांनी मोगा येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.राजस्थानमध्ये, क्रीडा क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व भूमिका शुक्ला यांनी जयपूरमधील तरुण सहभागींशी संवाद साधला, तर उत्तर प्रदेशातील कार्यक्रमांमध्ये सायकलिंग आणि 'खेलो इंडिया' सारख्या उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला.

'युवा संवाद' उपक्रमाद्वारे तरुण सहभागींना निवडणूक प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती मिळण्याची, मतदानाचा अधिकार व नागरिक जबाबदाऱ्यांवर चर्चा करण्याची, तसेच लोकप्रतिनिधी आणि 'युथ आयकॉन्स'शी (तरुणांचे आदर्श) थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.या सत्रांमध्ये माहितीची विश्वासार्ह स्रोतांकडून पडताळणी करण्यावर आणि चिकित्सक दृष्टिकोन ठेवण्यावरही भर देण्यात आला. प्रश्नमंजुषा, प्रश्नोत्तरांची सत्रे, 'लोकतांत्रिक शपथ' आणि 'माय भारत' (MY Bharat) पोर्टलवर नोंदणी करणे हे या मोहिमेतील काही इतर प्रमुख उपक्रम होते.

***

NehaKulkarni / SapmpadaPatgaonkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2333523) अभ्यागत कक्ष : 17