Posted On:
01 NOV 2026 12:35PM by PIB Mumbai
छत्तीसगडच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले की, छत्तीसगड हे राज्य आपल्या आदिवासी संस्कृती, नैसर्गिक संपत्ती आणि अद्वितीय लोकपरंपरांसाठी प्रसिद्ध आहे. राज्याचा समृद्ध पुरातत्व वारसा देखील त्याच्या ओळखीचा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. येथील चैतन्यमय लोकसंस्कृतीने समृद्ध असलेले वातावरण एक विलक्षण आपुलकीची भावना निर्माण करते, जी सर्वांचे लक्ष वेधून घेते.
नक्षलवादाची मुळे नष्ट करत, छत्तीसगड नवीन उत्साहाने विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे, हे पाहून आनंद होत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. राज्यातील प्रतिभावान आणि कष्टाळू लोकांच्या सहभागातून, छत्तीसगड देशाच्या समृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत राहील.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,
छत्तीसगडच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील सर्व रहिवाशांचे मनःपूर्वक अभिनंदन!
हे राज्य आपल्या आदिवासी संस्कृती, नैसर्गिक संपत्ती आणि अद्वितीय लोकपरंपरांसाठी ओळखले जाते. राज्याचा पुरातत्वीय वारसा ही त्याची विशेष ओळख आहे. लोकसंस्कृतीने समृद्ध असलेल्या या वातावरणात आपलेपणाची एक अनोखी भावना आहे, जी सर्वांना आकर्षित करते.
आज हे पाहून आनंद होतो की, नक्षलवादाची मुळे उखडून टाकतानाच आपले राज्य विकासाच्या मार्गावर अधिक वेगाने पुढे जात आहे. मला खात्री आहे की, माझ्या प्रतिभावान आणि मेहनती कुटुंबीयांच्या सहभागाने हे राज्य राष्ट्राच्या समृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत राहील.
हा विशेष प्रसंग छत्तीसगडच्या सर्व रहिवाशांसाठी कल्याणकारी होओ, अशी मी सदिच्छा व्यक्त करतो!
***
राधिका अघोर/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai