Posted On:
27 OCT 2026 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2026
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे क्रीडा क्षेत्रातील डोपिंग विरोधी युनेस्को आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत आयोजित COP10 ब्युरोच्या तिसऱ्या औपचारिक बैठकीचे आणि 2026-27 साठीच्या निधी मंजुरी समितीच्या चौथ्या औपचारिक बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.
_20261027151007_b84eeb.jpg)
डॉ.मांडविया यांनी ब्युरोला गैरमार्गविरहित निकोप क्रीडा स्पर्धेविषयी भारताच्या वचनबद्धतेची हमी दिली. "क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेसोबत नेहमीच प्रामाणिकपणा असला पाहिजे यावर भारताचा ठाम विश्वास आहे. प्रत्येक खेळाडूला स्पर्धा करण्याची न्याय्य संधी मिळाली पाहिजे, जिथे यश हे गुणवत्ता, पूर्वतयारी आणि कठोर परिश्रमाच्या आधारावर मिळवले गेले पाहिजे, प्रतिबंधित पदार्थ किंवा पद्धतींद्वारे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी नियमितपणे स्वच्छ क्रीडा संकल्पनेवर आणि डोपिंगच्या धोक्याविरुद्ध शून्य सहिष्णुता राखण्याच्या गरजेवर भर दिला आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी राष्ट्रीय अँटी-डोपिंग कायदा, 2022 आणि त्याच्या 2025 च्या दुरुस्तीद्वारे भारताची अँटी-डोपिंग चौकट मजबूत करण्यावर भर दिला. "भारताने राष्ट्रीय अँटी-डोपिंग कायदा, 2022 आणि त्याची 2025 ची दुरुस्ती, जे दोन्ही जुलै 2026 मध्ये लागू झाले, याद्वारे आपली कायदेशीर आणि संस्थात्मक चौकट मजबूत केली आहे," डॉ. मांडविया म्हणाले. "आम्ही आमच्या संसदेच्या पुढील अधिवेशनात आणखी एक दुरुस्ती आणणार आहोत, ज्याचा उद्देश प्रशिक्षक आणि पुरवठा साखळीतील भागधारकांसह उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाच्या तरतुदींचा समावेश करणे हा आहे."
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी पुढे डोपिंग रोखण्यासाठी आणि खेळाडूंना बंदी घातलेल्या पदार्थांबद्दल माहिती देण्यासाठी भारताने आधीच घेतलेल्या पावलांविषयी सांगितले.
_20261027151021_4f3e4e.jpg)
"2025-26 दरम्यान, भारताच्या राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीने (NADA) जोखीम-आधारित चाचणी आणि माहिती-आधारित तपासावर लक्ष केंद्रित करताना 7,000 हून अधिक चाचण्या आणि 350 पेक्षा जास्त शिक्षण व जनजागृती सत्रे आयोजित केली, ज्यामुळे 27,000 व्यक्तींपर्यंत पोहोचता आले," डॉ. मांडविया म्हणाले. "'नो युअर मेडिसिन' मोबाईल ॲप्लिकेशनवर पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी शोध घेतल्याची नोंद झाली आहे, जे औषधांबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात." डॉ. मांडविया यांनी Sport Values in Every Classroom टूलकिट भारतात सादर करण्यासाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि युनेस्को यांच्यात लवकरच होणाऱ्या भावी सामंजस्य करारावरील भारताकडून होणार असलेल्या स्वाक्षरीचे महत्त्व अधोरेखित केले. वर्गखोल्यांमध्ये क्रीडा मूल्ये, नैतिकता आणि प्रामाणिकपणा आणणे आणि लाखो तरुण मनांपर्यंत पोहोचणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. डोपिंगविरुद्धच्या लढ्यात जागतिक सहकार्य वाढवणे आणि कराराची अंमलबजावणी मजबूत करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट होते. जागतिक अँटी-डोपिंग परिसंस्थेतील सार्वजनिक प्राधिकरणांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांची रूपरेषा देणारा आराखडा दस्तऐवज, तसेच राष्ट्रीय अनुपालन प्लॅटफॉर्मद्वारे संबंधित बाजूंच्या सहभागातून अँटी-डोपिंग शिक्षण क्षमता आणि शैक्षणिक संशोधन मजबूत करण्यावर चर्चा केंद्रित होती. विषयपत्रिकेत शाश्वत जागतिक अँटी-डोपिंग प्रणालीला पाठिंबा देण्यासाठी संसाधन गतिशीलता, 2026-2031 साठी निधीची कार्यपद्धती, अनुपालन आणि क्षमता निर्मिती यांचाही समावेश होता.
_20261027151032_0b5eae.jpg)
सोनाली काकडे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai