पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर्षी वाल्मिकी यांच्यातील करुणा आणि रामायणाचा पाया अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे

Posted On: 26 OCT 2026 1:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महर्षी वाल्मिकी यांचे आदर्श विचारधन भारतीय संस्कृती आणि वारशाच्या मूलभूत घटकांचा भाग म्हणून आजही कायम राहिले असून ते प्रत्येक युगात राष्ट्राला समृद्ध आणि संपन्न करत राहील, मानवतेच्या संदर्भातील त्यांचे अमूल्य विचार देशातील नागरिकांना नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित शेअर केले असून या सुभाषितात महर्षी वाल्मीकी यांच्या अगाध करुणेवर प्रकाश टाकला आहे ज्या करुणेतून पहिल्या श्लोकाचा जन्म झाला आणि ज्याने रामायणाचा पाया रचला.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्टच्या मालिकेत लिहिले आहे:

महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्यांचे उदात्त विचार हे भारतीय संस्कृती आणि वारशाचा पाया आहेत, जे प्रत्येक युगात राष्ट्राचे पोषण करत राहतील. मानवतेसाठी असलेले त्यांचे अमूल्य संदेश आपल्या देशवासियांसाठी सदैव मार्गदर्शक ठरतील.

"तामभ्यगच्छद्रुदितप्रवादात्कविः कुशेध्माहरणाय यातः।

निषादविद्धाण्डजदर्शनोत्थः श्लोकत्वमापद्यत यस्य शोकः॥"

या श्लोकात म्हटल्याप्रमाणे, जेव्हा वाल्मिकी ऋषी जंगलात दर्भ आणि समिधा आणण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना क्रौंच पक्षिणीचा करुण आक्रोश ऐकू आला.  तो करुण आक्रोश ऐकून महर्षींच्या मनात तीव्र वेदना निर्माण झाली. आणि त्या करुणेतूनच एका श्लोकाची निर्मिती झाली आणि याच श्लोकाने संपूर्ण 'रामायण' या महाकाव्याचा भक्कम पाया रचला. या घटनेतून सर्वज्ञ महर्षी वाल्मीकी यांच्या हृदयातील करुणा, समभाव, तपश्चर्या आणि ज्ञान यांचे दर्शन घडते.

नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2328376) अभ्यागत कक्ष : 9