Posted On:
24 OCT 2026 4:54PM by PIB Mumbai
माय भारत राष्ट्रीय सेवा योजना, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत, विकसित भारत 100 आठवडे संकल्प अभियान आणि संस्थात्मक अभियानांतर्गत शिक्षण संस्थांना घेऊन 'नशा मुक्त युवा'च्या सहाव्या आठवड्याचा एक भाग म्हणून ग्रामसेवा परंपरागत खेल दिवस अर्थात ग्रामसेवा आणि पारंपारिक क्रीडा दिन आयोजित केले.

15 एनएसएस प्रादेशिक संचालनालयांसह एनएसएस संचालनालयाद्वारे राबविण्यात आलेला, हा उपक्रम 160 पेक्षा जास्त संस्था आणि त्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये राबविला गेला, ज्यात युवक, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ आणि स्थानिक रहिवासी यांच्यासह 80,000 पेक्षा जास्त सहभागींना एकत्र आणण्यात आले. तंदुरुस्त युवक, व्यसनमुक्त युवक, शक्ती एवम् सेवाच्या या दुसऱ्या महिन्याच्या संकल्पनेअंतर्गत हे उपक्रम आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये अंमली पदार्थमुक्त समाजाला चालना देण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती, समुदायाचा सहभाग आणि सामाजिक जबाबदारीची भूमिका अधोरेखित करण्यात आली.
पारंपारिक क्रीडा उपक्रमांचा एक भाग म्हणून, एनएसएस युनिट्सने कबड्डी, खो-खो,रस्सी खेच अर्थात टग ऑफ वॉर आणि कुस्ती या स्थानिक स्पर्धांचे आयोजन केले. या उपक्रमांमध्ये 21,500 पेक्षा जास्त जण सहभागी झाले. त्यांनी निरोगी मनोरंजन, टीमवर्क आणि ग्रामीण तरुणांमध्ये सकारात्मक सहभागाला प्रोत्साहन दिले.

ग्रामसेवा घटकाने एनएसएस स्वयंसेवक आणि ग्रामपंचायतींना एकत्र आणून सामुदायिक सेवा उपक्रम हाती घेतले, ज्यात गावातील गल्ल्यांची स्वच्छता, सार्वजनिक विहिरी आणि हातपंपांभोवती स्वच्छता आणि रोपांची लागवड मोहिमेचा समावेश आहे. 19,800 पेक्षा जास्त सहभागींनी या उपक्रमांमध्ये भाग घेतला, जे ग्रामीण विकासासाठी सामूहिक कृतीद्वारे 'Not Me, But You' हे एनएसएस'चे ब्रीदवाक्य प्रतिबिंबित करते.
याव्यतिरिक्त, समुदाय जागरूकता कार्यक्रम आणि निरोगी जीवनावर तरुण-नेतृत्वातील संवाद आणि नशा मुक्त मोहिमेमध्ये 18,600 पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी झाल्या. या उपक्रमात 29,500 पेक्षा जास्त तरुण महिलांचा सहभाग नोंदवला गेला आहे, ज्याने लिंग समावेशकतेवर प्रकर्षाने भर दिला.

मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी, युवा सहभागींनी #NashaMuktYuva हॅशटॅग वापरून 4,000 पेक्षा जास्त सोशल मीडिया पोस्ट तयार केल्या, ज्याद्वारे तळागाळातील उपक्रम अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचले.
पारंपारिक खेळ, सामुदायिक सेवा आणि जनजागृती उपक्रमांच्या एकत्रीकरणाद्वारे, मोहिमेच्या 6 व्या आठवड्याने शैक्षणिक संस्था आणि ग्रामीण समुदायांमधील संबंध मजबूत केला. या उपक्रमाने निरोगी जीवनशैली, सकारात्मक युवा सहभाग आणि नशा मुक्त विकसित भारताच्या दृष्टीकोनात सामूहिक सहभागाच्या महत्त्वाला समर्थन दिले.
***
माधुरी पांगे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com