Posted On:
24 OCT 2026 8:37AM by PIB Mumbai
भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या दलातील सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या. आयटीबीपीच्या हिमवीरांनी आपल्या असामान्य शौर्याने वेगळी ओळख निर्माण करत प्रत्येक आव्हानाचा त्यांनी उल्लेखनीय निर्धाराने सामना केला, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांची निःस्वार्थ सेवा आणि त्याग देशासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
"आयटीबीपीच्या स्थापना दिनानिमित्त या दलातील सर्व जवानांना शुभेच्छा.
आयटीबीपीच्या हिमवीरांनी आपल्या असामान्य शौर्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रत्येक आव्हानाचा त्यांनी उल्लेखनीय निर्धाराने सामना केला आहे.
त्यांची निःस्वार्थ सेवा आणि त्याग देशासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
***
आशिष सांगळे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com