Posted On:
23 OCT 2026 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2026
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक एफ-37/एफ-38 प्रकारात सुवर्णपदक जिंकून नवा विश्वविक्रम नोंदवणाऱ्या हॅनीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
हॅनीची ही उल्लेखनीय कामगिरी भारतीय पॅरा ॲथलेटिक्ससाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत, त्याने यापुढेही नवनवीन यश मिळवावे, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे की,
"आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक एफ-37/एफ-38 प्रकारात सुवर्णपदक जिंकून नवा विश्वविक्रम करणाऱ्या हॅनीचे अभिनंदन. ही उल्लेखनीय कामगिरी भारतीय पॅरा ॲथलेटिक्ससाठी अभिमानाची बाब आहे. हॅनीने यापुढेही नवनवीन यश मिळवत प्रगती करावी, अशी अपेक्षा - PM @narendramodi"
* * *
राधिका अघोर/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai