Posted On:
23 OCT 2026 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2026
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या रिकर्व्ह दुहेरीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तिरंदाज हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
या जोडीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशाची मान अभिमानाने उंचावली असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी त्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरच्या पोस्टमध्ये सामायिक केले आहे :
''हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांचे मोठे यश!
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या रिकर्व्ह दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल या जोडीचे अभिनंदन. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांच्या भविष्यतल्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा : पंतप्रधान @narendramodi"
* * *
राधिका अघोर/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai