Posted On:
22 OCT 2026 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या दुहेरी SL3-SU5 प्रकारात कांस्यपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शिवकुमार आणि सूर्यकांत यादव यांचे अभिनंदन केले आहे. या प्रकारात भारताला मिळालेले हे पहिलेच पदक आहे.
पदार्पणातच मिळवलेले हे यश दोन्ही खेळाडूंच्या कारकीर्दीतला महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांचे सांघिक कार्य, चिकाटी आणि समर्पण कौतुकास पात्र आहे, असेही ते म्हणाले.
X या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:
"भारतीय पॅरा बॅडमिंटनसाठी एक ऐतिहासिक कांस्यपदक!
नवीन शिवकुमार आणि सूर्यकांत यादव यांनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुष दुहेरी SL3-SU5 प्रकारात भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे. पदार्पणातच मिळवलेले हे यश दोन्ही खेळाडूंच्या कारकीर्दीतला महत्वपूर्ण टप्पा आहे. त्यांची सांघिक कामगिरी, चिकाटी आणि समर्पण कौतुकास पात्र आहे. त्यांचे अभिनंदन: PM @narendramodi”
* * *
राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai