Posted On:
22 OCT 2026 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या वैयक्तिक पॅरा कंपाऊंड तिरंदाजी या क्रीडा प्रकारात सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकत यशस्वीपणे आपले पदक राखल्याबद्दल शीतल देवी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
तिची अचूकता, सातत्य आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेप्रती असलेले समर्पण खरोखरच उल्लेखनीय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. त्यांनी शीतल देवी हिला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर लिहिले आहे,
"आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या वैयक्तिक पॅरा कंपाऊंड तिरंदाजी या क्रीडा प्रकारात शीतल देवी हिची उत्कृष्ट कामगिरी! तिने सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकत यशस्वीपणे आपले पदक राखले. तिची अचूकता, सातत्य आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेप्रती असलेले समर्पण खरोखरच उल्लेखनीय आहे.
तिला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा: PM @narendramodi”
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai