पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये सुवर्णा राज यांनी मिळवलेल्या शानदार विजयाबद्दल पंतप्रधानांनी केले त्यांचे अभिनंदन

Posted On: 22 OCT 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या थाळीफेक प्रकारातील एफ54 स्पर्धेत सुवर्णा राज यांनी शानदार विजय प्राप्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

“राज यांना मिळालेले यश हे त्यांचे कठोर परिश्रम, चिकाटी आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेप्रती असलेल्या अढळ निष्ठेचे फळ आहे. ते पुढे म्हणाले की भारत या उत्कृष्ट विजयाचा आनंद साजरा करत असून सुवर्णा यांच्या आगामी प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा देत आहे, " असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

एक्स मंचावरील संदेशात, पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:

“आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या थाळीफेक प्रकारातील एफ54 स्पर्धेत शानदार विजय प्राप्त केल्याबद्दल सुवर्णा राज यांचे अभिनंदन! त्यांना मिळालेले यश हे त्यांचे कठोर परिश्रम, चिकाटी आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेप्रती असलेल्या अढळ निष्ठेचे हे फळ आहे. भारत या उत्कृष्ट विजयाचा आनंद साजरा करत आहे. आगामी प्रयत्नांसाठी शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi"

 

* * *

राधिका अघोर/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326820) अभ्यागत कक्ष : 8