पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल रवी रोंगाली यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 21 OCT 2026 7:20PM by PIB Mumbai

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये 2026 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक  F40 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल रवी रोंगाली यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

ही आणखी एक उत्तम कामगिरी असल्याचे नमूद करून मोदी यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना सातत्याने मिळत असलेले यश हे खेळाप्रति त्यांचे समर्पण आणि वचनबद्धता दर्शवते.

पंतप्रधान कार्यालयाने X वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे:

“रवी रोंगालीची  आणखी एक चांगली कामगिरी!

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये 2026 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक  F40 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचे सातत्यपूर्ण यश त्याचे खेळाप्रति समर्पण आणि वचनबद्धता दर्शवते: पंतप्रधान  @narendramodi"

***

Nilima Chitale / Rajashree Agashe / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326314) अभ्यागत कक्ष : 4