पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून सचिन खिलारी यांचे अभिनंदन
Posted On:
21 OCT 2026 6:44PM by PIB Mumbai
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकून आपले विजेतेपद यशस्वीपणे कायम राखणाऱ्या सचिन खिलारीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
आपले विजेतेपद कायम राखणे आणि पोडीयमवर भारतीय खेळाडूंचा दबदबा राखणे ही असाधारण कामगिरी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. सचिनची सातत्यपूर्ण कामगिरी, दृढनिश्चय आणि क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्टता खरोखरच प्रेरणादायी असल्याचे सांगत पंतप्रधानांनी या उल्लेखनीय विजेत्याचे त्याच्या क्रीडा प्रवासातील आणखी एका गौरवशाली यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“एक उल्लेखनीय विजेता!
2026 च्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात सचिन खिलारी याने पुन्हा एकदा विजय मिळवत हंगामातील सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्णपदक कायम राखले आहे. आपले विजेतेपद यशस्वीपणे टिकवून ठेवणे आणि संपूर्ण पदकतालिकेत भारतीय खेळाडूंचा दबदबा राखणे ही असाधारण कामगिरी आहे. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी, दृढनिश्चय आणि क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्टता खरोखरच प्रेरणादायी आहे. क्रीडा प्रवासातील आणखी एका गौरवशाली यशाबद्दल सचिनचे मनःपूर्वक अभिनंदन. पंतप्रधान @narendramodi”
***
Nilima Chitale / Shraddha Mukhedkar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2326294)
अभ्यागत कक्ष : 7