पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रणव सूरमा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
20 OCT 2026 9:25PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या F51/52/53 गटातील थाळीफेक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रणव सूरमा यांचे अभिनंदन केले.
नवा आशियाई विक्रम स्थापित केल्यामुळे हे प्रतिष्ठेचे पदक आणि विजय अधिकच विशेष ठरल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. प्रणवचे सामर्थ्य, दृढनिश्चय आणि स्पर्धात्मक वृत्ती प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांनी प्रणवचे अभिनंदन केले.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“प्रतिष्ठेचे पदक आणि आशियाई स्पर्धेतील विक्रम!
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये प्रणव सूरमा यांनी पुरुषांच्या F51/52/53 गटातील थाळीफेक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. नवा आशियाई विक्रम स्थापित केल्यामुळे हा विजय अधिकच विशेष ठरला आहे. प्रणवचे सामर्थ्य, दृढनिश्चय आणि स्पर्धात्मक वृत्ती प्रेरणादायी आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन. — PM @narendramodi”
***
Neha Kulkarni / Shraddha Mukhedkar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325922)
अभ्यागत कक्ष : 7