पंतप्रधान कार्यालय
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भाविना पटेलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
20 OCT 2026 6:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2026
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या एकेरी गटातील वर्ग 4-5 या प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल भाविना पटेलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
भाविना पटेलच्या कारकिर्दीत आणखी एका पदकाची आणि महत्त्वपूर्ण टप्प्याची भर पडल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाविनाने राखलेली सातत्यपूर्ण कामगिरी आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेप्रति तिची अढळ बांधिलकी खरोखरच प्रशंसनीय असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तसेच भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“आणखी एक पदक, आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा!
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या एकेरी गटातील वर्ग 4-5 या प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल @BhavinaOfficial चे अभिनंदन. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केलेली सातत्यपूर्ण कामगिरी आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेप्रति त्यांची अढळ बांधिलकी खरोखरच प्रशंसनीय आहे. आगामी वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा : PM @narendramodi”
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325591)
अभ्यागत कक्ष : 9