पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या J2 प्रकारातील 52 किलो वजनी गटाच्या ज्युदो स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल ज्युदोपटू कोकिलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
19 OCT 2026 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2026
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या J2 प्रकारातील 52 किलो वजनी गटाच्या ज्युदो स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल कोकिला हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
मागील आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर, यंदा नव्या वजनी गटात रौप्यपदक मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास उल्लेखनीय चिकाटी, समर्पण आणि दृढनिश्चयाचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आगामी काळातही तिला यश मिळत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे,
“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या J2 प्रकारातील 52 किलो वजनी गटाच्या ज्युदो स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल कोकिलाचे अभिनंदन! मागील आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक ते नव्या वजनी गटात रौप्यपदक, हा तिचा प्रवास उल्लेखनीय चिकाटी, समर्पण आणि दृढनिश्चयाचे दर्शन घडवतो. आगामी काळातील तिच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा : PM @narendramodi”
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325466)
अभ्यागत कक्ष : 4