संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दलाने लेह येथून अतिशय थोडक्या कालावधीत, आव्हानात्मक परिस्थितीत हवाई मार्गे रुग्णाला उपलब्ध करून दिली तातडीची मदत
Posted On:
18 OCT 2026 10:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2026
भारतीय हवाई दलाच्या सी-130जे विमानाने रात्री उशिरा अल्प सूचनेवर वैद्यकीय स्थलांतराची मोहीम राबवली. गंभीर आजारी असलेल्या 30 वर्षीय नागरी रुग्णाला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी लेह येथून पालम येथे हवाई मार्गाने आणण्यात आले.
ही मोहीम अंधारात आणि आव्हानात्मक हवामान परिस्थितीत पार पाडण्यात आली. त्यासाठी उच्च दर्जाची कार्यतत्परता, व्यावसायिक समन्वय आणि वेळेवर कार्यवाही आवश्यक होती. त्यानंतर रुग्णाला पुढील उपचारांसाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले.
ही मोहीम भारतीय हवाई दलाची कार्यतत्परता आणि आव्हानात्मक परिस्थितीत वैद्यकीय स्थलांतरासह गंभीर मानवतावादी गरजांना त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता अधोरेखित करते.


* * *
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324974)
अभ्यागत कक्ष : 9