गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंजाब आज अंमली पदार्थ, गुंडगिरी आणि संघटित गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्यांशी झुंज देत आहे: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची टीका


अंमली पदार्थविरोधी कठोर कारवाई, तरुणांच्या भविष्याचे रक्षण, गुन्हेगारांना कडक शासन आणि भयमुक्त पंजाब हेच आमचे स्पष्ट ध्येय आहे: अमीत शाह

Posted On: 16 OCT 2026 6:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2026

 

पंजाब आज अमली पदार्थ, गुंडगिरी आणि संघटित गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्यांचा सामना करत असल्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "पंजाब आज अमली पदार्थ, गुंडगिरी आणि संघटित गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्यांशी लढा देत आहे. पंजाब सरकारसमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, पंजाबच्या जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी शेवटी कोण घेणार? पंजाबमध्ये अंमली पदार्थांचा व्यापार फोफावत आहे, संघटित गुन्हेगारीचा धोका वाढत आहे आणि अमली पदार्थां विरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री महोदय, पंजाबच्या जनतेला प्रसिद्धी नको, त्यांना उत्तरे हवी आहेत, घोषणा नकोत, तर उपाय हवे आहेत, अंमली पदार्थांच्या जाळ्याविरुद्ध निर्णायक कारवाई हवी आहे आणि गुन्हेगारांना मिळणाऱ्या कोणत्याही राजकीय आश्रयाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी आहे. आमचे ध्येय स्पष्ट आहे, ते म्हणजे, अंमली पदार्थांच्या व्यापारावर कठोर प्रहार करणे, आपल्या तरुणांच्या भविष्याचे रक्षण करणे, गुन्हेगारां विरोधात कडक कारवाई करणे आणि कायद्याचे असे राज्य प्रस्थापित करणे, की कोणत्याही नागरिकाला भीतीच्या छायेखाली जगण्यासाठी भाग पाडले जाणार नाही."

 

* * *

राधिका अघोर/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324491) अभ्यागत कक्ष : 15