पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
चंदीगडमधील सुखना पाणथळ क्षेत्र आणि उत्तर प्रदेशातील सौज सरोवर यांच्या समावेशामुळे भारतातील रामसर स्थळांची संख्या 103 वर
Posted On:
15 OCT 2026 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026
चंदीगडमधील सुखना पाणथळ क्षेत्र आणि उत्तर प्रदेशातील सौज सरोवर यांचा यादीत समावेश केल्याने भारतातील रामसर स्थळांची संख्या 103 झाल्याची घोषणा केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केली.
भारत पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी आपली वचनबद्धता अधिक दृढ करत आहे, असे यादव यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून पाणथळ जागांच्या संवर्धनाला दिले जाणारे महत्त्व यादव यांनी अधोरेखित केले. विशेषतः जैवविविधतेचे संवर्धन, जल आणि हवामान सुरक्षा वाढवणे आणि स्थानिक उपजीविका टिकवून ठेवण्यासाठी पाणथळ जागा महत्त्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले.
या नव्या स्थळांच्या समावेशामुळे देशाच्या समृद्ध पाणथळ परिसंस्थांचे संवर्धन करण्याच्या आणि त्यातून मिळणारे पर्यावरणीय, हवामानविषयक आणि उपजीविकेचे फायदे अधिक बळकट करण्याच्या भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ मिळाले आहे. यादव यांनी या कामगिरीबद्दल उत्तर प्रदेश आणि चंदीगडचे अभिनंदन केले आहे. तसेच, पर्यटकांनी सुखना आणि सौज येथील नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी या स्थळांना भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324160)
अभ्यागत कक्ष : 4