कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सोयाबीनची एनआरसी 268 आणि एनआरसी 270 ही सुधारित वाण प्रतिकूल हवामानातही हेक्टरी 20 क्विंटल उत्पादन मिळवून देण्याचे सकारात्मक संकेत देणारी

Posted On: 13 OCT 2026 3:12PM by PIB Mumbai

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) इंदूर येथील आयसीएआर-राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्थेने 9 ऑक्टोबर 2026 रोजी 'सोयाबीन काढणी दिन' आयोजित केला होता. यावेळी संस्थेने विकसित केलेली  सुधारित सोयाबीन वाण एनआरसी 268 आणि एनआरसी 270 च्या उत्पादन क्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले.  या दोन वाणांची प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर काढणी केल्यानंतर मिळालेल्या प्राथमिक आकडेवारीवरून, प्रति हेक्टर सुमारे 20 क्विंटल इतके उत्साहवर्धक उत्पन्न मिळत असल्याचे दिसून येते. प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत सुधारित वाणांची कामगिरी समजून घेण्यासाठी आणि देशाची सोयाबीनची उत्पादकता वाढवण्याची क्षमता तपासण्यासाठी हे मूल्यांकन महत्त्वाचे आहे. सध्या भारतात सोयाबीनची सरासरी उत्पादकता प्रति हेक्टर सुमारे 10–11 क्विंटल इतकी आहे.

आयसीएआर-राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्था आणि अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन प्रकल्पांतर्गत देशभरात केलेले संशोधन आणि चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की सुधारित वाण आणि योग्य उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रति हेक्टर 15-20 क्विंटल उत्पादन मिळवता येऊ शकते. अनुकूल परिस्थितीत, उत्पादन प्रति हेक्टर अंदाजे 22-25 क्विंटलपर्यंत पोहोचू शकते.

***

Sonali Kulkarni / Rajashree Agashe / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2322860) अभ्यागत कक्ष : 7