संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये विक्रमी 27 पदके जिंकणाऱ्या 'सैन्य दलाच्या ' खेळाडूंचा सत्कार
Posted On:
12 OCT 2026 4:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 12 ऑक्टोबर 2026 रोजी, जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत 27 पदके (6 सुवर्ण, 11 रौप्य आणि 10 कांस्य) जिंकणाऱ्या सैन्य दलांमधील खेळाडूंचा सत्कार केला. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सैन्य दलांच्या खेळाडूंच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीचा बहुमान करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी देखील उपस्थित होते. तिन्ही सैन्य दलांमधील एकूण 92 खेळाडूंनी 19 क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला आणि भारताला चौथे स्थान मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतीय पथकाने एकूण 85 पदके 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्यपदके जिंकली.
_20261012135340_893944.jpeg)
_20261012135352_d2d3ff.jpeg)
भारतीय क्रीडा क्षेत्रातील 'सर्व्हिसेस'च्या (सैन्य दलाच्या ) महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख करताना, संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले की संरक्षण दलांनी सातत्याने अशा खेळाडूंना घडवले आहे, जे केवळ त्यांच्या शारीरिक क्षमतेसाठीच नव्हे, तर शिस्त, संयम, नेतृत्वगुण आणि आव्हानात्मक परिस्थितीतही ध्येयाप्रति अतूट निष्ठेसाठी ओळखले जातात.
_20261012135530_2c077e.jpeg)
राजनाथ सिंह यांनी 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी केंद्रित आणि सुव्यवस्थित दृष्टिकोन अवलंबण्याचे आवाहन केले; तसेच प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना खेळाडूंना समर्पित व व्यावसायिक मार्गदर्शन करणे सुरू ठेवण्यास सांगितले. तसेच उत्तुंग ध्येये निर्धारित करण्यास आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये आणखी चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित केले.
याप्रसंगी लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील 'सैन्यदलांचे' खेळाडू
भारताच्या एकूण पदकसंख्येत 'सैन्यदलांच्या खेळाडूंचा वाटा 32 टक्के, तर सुवर्णपदकांमध्ये 28.57 टक्के इतका होता. यामध्ये नायब सुभेदार नीरू धांडा यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली; त्यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेतील महिलांच्या वैयक्तिक 'ट्रॅप' (Trap) प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. नायब सुभेदार गुलवीर सिंग यांनी दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले; आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत तीन वैयक्तिक पदके जिंकणारे ते पहिले भारतीय पुरुष ट्रॅक-अँड-फील्ड खेळाडू बनले. हवालदार सावन बरवाल यांनी पुरुषांच्या मॅरेथॉन प्रकारात 2:11:37 या राष्ट्रीय विक्रमी वेळेची नोंद करत रौप्य पदक जिंकले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉन पदकासाठी भारताची 44 वर्षांची प्रतीक्षा संपवली. तसेच, नायब सुभेदार सर्वेश कुशारे यांनी पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारतासाठी 56 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऐतिहासिक पदक जिंकले.
_20261012135649_257347.jpeg)
शैलेश पाटील/सुषमा काणे /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322274)
अभ्यागत कक्ष : 10