संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोलकाता येथील जीआरएसईमध्ये पुढील पिढीतील अपतटीय गस्ती नौकेचे (यार्ड 3040, श्रेयस) जलावतरण

Posted On: 10 OCT 2026 7:20PM by PIB Mumbai

 

यार्ड 3040 (श्रेयस) या पुढील पिढीतील अपतटीय गस्ती नौकेचे (एनजीओपीव्ही) 10 ऑक्टोबर 2026 रोजी कोलकाता येथील जीआरएसईमध्ये रेमन कोचर यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. यावेळी नौदलाचे उपप्रमुख व्हाइस ॲडमिरल अजय कोचर उपस्थित होते. या कार्यक्रमातून भारतीय नौदलाच्या समृद्ध परंपरा आणि मूल्यांचे दर्शन घडले. भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय, जीआरएसई आणि उद्योग भागीदारांचे वरिष्ठ पदाधिकारी  या प्रसंगी उपस्थित होते.

पुढील पिढीतील अपतटीय गस्ती नौकांची बांधणी गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल), गोवा आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई), कोलकाता या दोन जहाजबांधणी केंद्रांमध्ये एकाच वेळी सुरू आहे. स्वदेशी पद्धतीने रचना करून बांधण्यात येणाऱ्या या नौका सागरी देखरेख, शोध आणि  बचावकार्य, सागरी क्षेत्रातील महत्त्वाच्या मालमत्तांचे संरक्षण, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) तसेच चाचेगिरीविरोधी मोहिमा अशा विविध क्षेत्रांतील कार्यांसाठी विद्यमान ओपीव्ही आणि एनओपीव्हीची  क्षमता वाढवतील. या नौकांना भारताच्या समृद्ध वारशातून नावे देण्यात आली आहेत. या नौकेचे नाव ‘श्रेयस’ असे ठेवण्यात आले असून, संस्कृतमध्ये त्याचा अर्थ ‘सर्वोत्तम’ किंवा ‘अत्यंत उत्कृष्ट’ असा होतो.

या नौकेचे जलावतरण हे स्वदेशी जहाजबांधणीच्या दिशेने भारतीय नौदलाच्या वाटचालीतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनांशी सुसंगत आहे.

***

निलिमा जोशी/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2321833) अभ्यागत कक्ष : 14