संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उद्या विशाखापट्टणम येथे पहिल्या 'फ्लीट सपोर्ट शिप'चे (एफ एस एस-1) जलावतरण करणार, एफ एस एस-5 ची पाया रचणार आणि अद्ययावत 'स्लिपवे-4' तसेच 300-टनांच्या गॉलियाथ क्रेनचे उद्घाटन करणार
Posted On:
05 OCT 2026 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2026
भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेचे एक महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिक म्हणून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 6 ऑक्टोबर 2026 रोजी विशाखापट्टणम इथे 'हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड'मध्ये 'फ्लीट सपोर्ट शिप-1' (एफ एस एस-1) चे जलावतरण करून 'फ्लीट सपोर्ट शिप-5' (एफ एस एस-5) चा पाया रचतील तसेच अद्ययावत 'स्लिपवे-4' तसेच 300-टनांच्या गॉलियाथ क्रेनचे उद्घाटन करणार आहेत.
अद्ययावत 'स्लिपवे-4' ची वाढलेली लांबी आणि भार वाहण्याची सुधारित क्षमता, तसेच त्याला मिळणारी 300-टनांच्या 'गॉलियाथ क्रेन'ची जोड यामुळे शिपयार्डला 45,000 डी डब्लू टी पर्यंतची जहाजे बांधणे आणि त्यांचे जलावतरण करणे शक्य होणार आहे. यामुळे मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जहाजांची निर्मिती करण्याची शिपयार्डची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
भारतीय नौदलासाठी बांधल्या जाणाऱ्या पाच फ्लीट सपोर्ट शिप्सपैकी पहिली असलेली एफ एस एस-1, पोलाद कापल्यानंतर बांधकामाच्या सुरुवातीच्या टप्प्याच्या अवघ्या 18 महिन्यांनंतर बंगालच्या उपसागरात उतरवली जाईल. 43,500 टनांची ही जहाजे समुद्रात युद्धनौकांना इंधन आणि इतर सामग्रीचा पुरवठा करतील, ज्यामुळे नौदलाची कार्यक्षमता आणि हिंदी महासागर क्षेत्रातील त्यांचा आवाका वाढेल. एफ एस एस-5 चा पायाभूत साचा रचणे ही या कार्यक्रमांतर्गत जहाजांच्या शृंखला निर्मितीच्या दिशेने होणारी एक स्थिर वाटचाल असेल.
या कार्यक्रमांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, (संरक्षण उत्पादन) सचिव संजीव कुमार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राधिका अघोर/संदेश नाईक/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2319404)
अभ्यागत कक्ष : 7