पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
भारतात जन्मलेल्या चित्त्याच्या मादीने कुनो राष्ट्रीय उद्यानात 5 निरोगी पिल्लांना जन्म दिला; भारतातील चित्त्यांची संख्या 60 वर पोहोचली
Posted On:
05 OCT 2026 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,5 ऑक्टोबर 2026
प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आणखी एका ऐतिहासिक टप्प्याची नोंद झाली असून, भारतात जन्मलेल्या KJP21 या 32 महिने वयाच्या मादी चित्त्याने आज कुनो नॅशनल पार्कमध्ये पाच निरोगी पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे भारतातील चित्त्यांची एकूण संख्या 60 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये भारतात जन्मलेल्या 41 चित्त्यांचा समावेश आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या घडामोडीची माहिती 'X' या समाज माध्यमावर एका एका पोस्टद्वारे दिली. 'मुखी' आणि 'KGP12' नंतर पिल्लांना जन्म देणारी KJP21 ही भारतात जन्मलेली तिसरी मादी चित्ता ठरली आहे, असे त्यांनी सांगितले. ही घटना भारतातील चित्त्यांच्या संख्येच्या पुढील पिढीच्या उदयातील एक महत्त्वाचा टप्पा दर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाच पिल्लांचा जन्म बोट्स्वानाच्या नर चित्त्यापासून झाला असल्याने ही घटना भारतातील बोत्स्वाना वंशाच्या प्रारंभाला दर्शवत आहे, असे यादव म्हणाले. यामुळे भारताच्या वाढत्या चित्त्यांच्या संख्येत एक नवीन जनुकीय वंश जोडला गेला आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांनी या घडामोडीचे वर्णन भारतीय भूमीवर जन्मलेली चित्त्यांची आणखी एक पिढी असे केले, ज्यामुळे भारतातील चित्ता पुनरुज्जीवन योजनेच्या कथेत एक नवीन अध्यायाची भर पडली आहे.
यादव यांनी पशुवैद्य, क्षेत्र कर्मचारी, व्यवस्थापक आणि प्रोजेक्ट चित्ताशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे मनापासून अभिनंदन केले, ज्यांचे समर्पण, वचनबद्धता आणि अथक प्रयत्नांमुळे हे चित्तासंवर्धन शक्य झाले आहे.
निलिमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2319378)
अभ्यागत कक्ष : 6