शिक्षण मंत्रालय
पुण्याच्या डेक्कन कॉलेजसह देशात 5 अभिजात भाषा उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी
Posted On:
03 OCT 2026 5:40PM by PIB Mumbai
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने, अभिजात मराठी, अभिजात आसामी, अभिजात बंगाली, , अभिजात पाली आणि अभिजात प्राकृत या भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे.
हा उपक्रम या अभिजात भाषांचे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचे जतन व संगणकीकरण करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी हक्काचा संस्थात्मक पाठबळ देईल.
ही उत्कृष्टता केंद्रे खालील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापन केली जातील:
|
अ. क्र.
|
अभिजात भाषा
|
उत्कृष्टता केंद्र
|
|
1.
|
अभिजात आसामी
|
तेजपूर युनिव्हर्सिटी, आसाम
|
|
2.
|
अभिजात बंगाली
|
विश्वभारती युनिव्हर्सिटी, पश्चिम बंगाल
|
|
3.
|
अभिजात मराठी
|
डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (डिम्ड युनिव्हर्सिटी), पुणे, महाराष्ट्
|
|
4.
|
अभिजात पाली
|
सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओडिशा, ओडिशा
|
|
5.
|
अभिजात प्राकृत
|
सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात, गुजरात
|
या 5 केंद्रांची स्थापना ही भारताच्या अभिजात भाषांचा अभ्यास, संशोधन आणि जतनासाठी संस्थात्मक व्यवस्थेला बळकट करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
लक्ष केंद्रित करण्याचे मुख्य क्षेत्र
ही उत्कृष्टता केंद्रे 4 व्यापक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतील:
शैक्षणिक संशोधन आणि शिष्यवृत्ती बळकट करणे:
ही केंद्रे संबंधित अभिजात भाषांमधील प्रगत संशोधन, अभ्यासपूर्ण काम आणि शैक्षणिक सहभागासाठी हक्काचे संस्थात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देतील.
जतन आणि डिजिटायझेशन (संगणकीकरण):
ही केंद्रे भाषिक आणि साहित्यिक स्रोतांचे दस्तऐवजीकरण, जतन आणि डिजिटायझेशन करण्यासाठी सहकार्य करतील. त्यामुळे भारताच्या समृद्ध ग्रंथसंपदा आणि लिखित वारशाच्या दीर्घकालीन संरक्षणास हातभार लागेल.
अभिजात भाषांच्या वारशाचा व्यापक प्रसार:
ही केंद्रे संबंधित अभिजात भाषांशी जोडलेल्या भाषिक, साहित्यिक आणि ज्ञान परंपरा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांचा व्यापक प्रसार करण्यासाठी मदत करतील.
प्रादेशिक शैक्षणिक व्यवस्थेला बळकट करणे:
महाराष्ट्र, आसामी, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि गुजरात अशा 5 राज्यांमध्ये पसरलेली ही केंद्रे, अभिजात भाषांमधील उच्च शिक्षण, संशोधन आणि शिष्यवृत्तीसाठी प्रादेशिक व्यवस्थेला अधिक बळकट करतील.
या उपक्रमामुळे उच्च शिक्षण संस्थांना संशोधन आणि शिष्यवृत्तीचे केंद्र म्हणून मजबूत करत असतानाच, भारताचा समृद्ध भाषिक आणि साहित्यिक वारसा जतन करून त्याचा प्रसार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ मिळणार आहे.
***
शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2318761)
अभ्यागत कक्ष : 16