राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

टांझानिया येथे होणाऱ्या 153व्या आंतर संसदीय संघ अधिवेशनात (IPU) सहभागी होणाऱ्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्यसभेचे उपसभापति हरिवंश यांच्याकडे

Posted On: 03 OCT 2026 12:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2026

राज्यसभेचे माननीय उपसभापती हरिवंश यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संसदीय शिष्टमंडळ, 5 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणाऱ्या 153व्या ‘आंतर संसदीय संघ अधिवेशनात आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी टांझानिया प्रजासत्ताकातील अरुशा शहराकडे रवाना झाले.

"सर्वसमावेशकता, विश्वास आणि सर्वांसाठी संधीच्या माध्यमातून सुशासनाला बळकट करणे आणि समुदायांचे सक्षमीकरण करणे" ही या अधिवेशनाची संकल्पना असून, या विषयावर विचारमंथन करण्यासाठी जगभरातील संसद सदस्य एकत्रित होत आहेत.

भारतीय शिष्टमंडळात पुढील संसद सदस्य समाविष्ट आहेत: हरिवंश, राज्यसभेचे माननीय उपसभापती आणि शिष्टमंडळाचे नेते, अनुराग सिंह ठाकूर – खासदार - लोकसभा; अपराजिता सारंगी - खासदार, लोकसभा; डॉ. सस्मित पात्रा, खासदार - राज्यसभा; डॉ.संजय जयस्वाल, खासदार - लोकसभा; श्रीमती कमलजीत सेहरावत, खासदार- लोकसभा; डॉ. लता वानखेडे, खासदार, - लोकसभा; श्रीमती बिजली कलिता मेधी, खासदार- लोकसभा; आणि एन. के. प्रेमचंद्रन, खासदार- लोकसभा.

हे शिष्टमंडळ समकालीन जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आयोजित विविध बैठका, परिसंवाद आणि कार्यशाळांमध्ये सहभागी होईल आणि या विषयांवर भारताची भूमिका मांडेल.

श्री हरिवंश हे 'नियामक मंडळ’, 'सर्वसाधारण चर्चा', 'तातडीच्या विषयावरील चर्चा' आणि 'आयपीयू (IPU) अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या विचार-विनिमयात सहभागी होतील.

लोकशाही आणि मानवाधिकार, शांतता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, शाश्वत विकास, महिलांचा सहभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दहशतवाद-विरोधी उपाय, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, महत्त्वपूर्ण खनिजे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील कामाचे स्वरूप, तसेच  सागरी सुरक्षा, हवामान बदल, पर्वतीय आणि सागरी परिसंस्थांचे संरक्षण यांसारख्या विविध विषयांवरील चर्चांमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य सहभागी होतील.

आंतर संसदीय संघ अधिवेशनातील (IPU) भारतीय संसदीय शिष्टमंडळाचा सहभाग हा आयपीयूसोबत भारताचे असलेले निरंतर संबंध, संवाद तसचे जागतिक शांतता, विकास, लोकशाही आणि समुदायांच्या सक्षमीकरणाला प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांवर संसदेतील सहकार्यासाठी असलेल्या भारताच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.

***

शिल्पा पोफळे/सविता म्हसकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2318641) अभ्यागत कक्ष : 7