पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या स्किफ प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 02 OCT 2026 1:18PM by PIB Mumbai

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या स्किफ प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की, दृढनिश्चय आणि सातत्याच्या बळावर त्यांनी भारताला पदकाच्या व्यासपीठावर स्थान मिळवून दिले असून, मागील कामगिरीतही सुधारणा केली आहे.

पंतप्रधानांनी हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यम मंचावर सांगितले;

“आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या स्किफ प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांचे अभिनंदन! दृढनिश्चय आणि सातत्याच्या बळावर त्यांनी भारताला पदकाच्या व्यासपीठावर स्थान मिळवून दिले असून, मागील कामगिरीतही सुधारणा केली आहे. त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा: पंतप्रधान नरेंद्र मोदी  

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2318527) अभ्यागत कक्ष : 7