पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत मुष्टियुध्दात महिलांच्या 75 किलो गटात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून लवलिना बोर्गोहेनचे अभिनंदन

Posted On: 02 OCT 2026 6:05PM by PIB Mumbai

 

आशियाई क्रीडा स्पर्धेतील आशियाई क्रीडा स्पर्धेत मुष्टियुध्दात महिलांच्या 75 किलो गटात अंतिम फेरीत दणदणीत 5-0 असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकणाऱ्या लवलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

लवलिनाचा क्रीडा प्रवास उल्लेखनीय दृढनिश्चय आणि उत्कृष्टतेचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

मोदी यांनी लवलिना बोर्गोहेनला तिच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे,

“@LovlinaBorgohai कडून अतिशय उत्कृष्ट कामगिरी!

आशियाई क्रीडा स्पर्धेतील मुष्टियुद्धात महिलांच्या 75 किलो गटात अंतिम फेरीत दणदणीत 5-0 असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल लवलिनाचे अभिनंदन. तिचा क्रीडा प्रवास उल्लेखनीय दृढनिश्चय आणि उत्कृष्टतेचे प्रतिबिंब आहे. तिच्या आगामी वाटचालीसाठी तिला हार्दीक शुभेच्छा - पंतप्रधान @narendramodi”

***

माधुरी पांगे/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2318377) अभ्यागत कक्ष : 11