पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महिलांच्या रिकर्व्ह सांघिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकिता भकत, कुमकुम अनिल मोहोड आणि कीर्ती यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 02 OCT 2026 1:20PM by PIB Mumbai

 

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या रिकर्व्ह सांघिक स्पर्धेत भारताचे पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकिता भकत, कुमकुम अनिल मोहोड आणि कीर्ती यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात त्यांनी दाखवलेला संयम आणि अचूकता उल्लेखनीय होती. या ऐतिहासिक विजयामुळे देशभरातील असंख्य युवा तिरंदाजांना प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

भारताला आपल्या या विजेत्यांचा अभिमान असल्याचे   मोदी यांनी म्हटले असून, अंकिता भकत, कुमकुम अनिल मोहोड आणि कीर्ती यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे;

“संपूर्ण देशाला आनंदित करणारे हे ऐतिहासिक सुवर्णपदक आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या रिकर्व्ह सांघिक स्पर्धेत भारताचे पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकिता भकत, कुमकुम अनिल मोहोड आणि कीर्ती यांचे अभिनंदन. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात त्यांनी दाखवलेला संयम आणि अचूकता उल्लेखनीय होती. या ऐतिहासिक विजयामुळे देशभरातील असंख्य युवा तिरंदाजांना प्रेरणा मिळेल. भारताला आपल्या विजेत्यांचा अभिमान आहे! त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा : पंतप्रधान @narendramodi

***

शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2318211) अभ्यागत कक्ष : 9