पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल धीरज बोम्मदेवरा आणि कुमकुम अनिल मोहोड यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 02 OCT 2026 1:22PM by PIB Mumbai

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल धीरज बोम्मदेवरा आणि कुमकुम अनिल मोहोड यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

दोन्ही खेळाडूंनी विशेष कौशल्य आणि उत्साह दर्शवत, आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारात भारताला पहिलेवहिले रौप्यपदक मिळवून दिले, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले आहे.

या संस्मरणीय कामगिरीबद्दल मोदी यांनी दोन्ही तिरंदाजांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे ;

“शानदार रौप्यपदक!

आशियाई क्रीडा स्पर्धेतील रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल धीरज बोम्मदेवरा आणि कुमकुम अनिल मोहोद यांचा अभिमान वाटतो.

त्यांनी उल्लेखनीय कौशल्य आणि उत्साहाचे प्रदर्शन करत आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारात आपल्या देशाला पहिलेवहिले रौप्यपदक मिळवून दिले.

या संस्मरणीय कामगिरीबद्दल आपल्या दोन्ही तिरंदाजांचे अभिनंदन आणि त्यांच्या आगामी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.”

***

नेहा कुलकर्णी/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2318209) अभ्यागत कक्ष : 7