पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला स्क्वॉश संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 01 OCT 2026 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2026

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारताच्या महिला स्क्वॉश संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. त्यांनी संघाच्या जोमदार आणि उत्साही प्रयत्नांचे कौतुक केले. खेळाडूंनी मोठ्या निर्धाराने पदक जिंकल्यामुळे त्या सन्मानास पूर्णपणे पात्र ठरल्या आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या यशामुळे तरुणांना स्क्वॉश खेळाकडे वळण्यासाठी मोठी प्रेरणा मिळेल, कारण हा खेळ भारतात खूप लोकप्रिय होत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाने  'X' वर म्हटले आहे :

"2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या  भारतीय महिला स्क्वॉश संघाचा मला अभिमान वाटतो. त्यांनी उमेदीने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन. त्या मोठ्या जिद्दीने खेळल्या आणि त्यांनी पदकावर शिक्कामोर्तब केले. हे यश तरुणांना स्क्वॉश खेळाकडे वळण्यास प्रेरित करेल, जो भारतात लोकप्रिय होत आहे: PM @narendramodi”

 

* * *

सुषमा काणे/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2317824) अभ्यागत कक्ष : 7