पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून पारुल चौधरी हिचे अभिनंदन

Posted On: 28 SEP 2026 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पारुल चौधरी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की, तिचे हे यश नवोदित खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे.  मोदी यांनी तिला भविष्यातील प्रयत्नांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

एक्स या समाजमाध्यमावर एका टिप्पणीमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:

"आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पारुल चौधरी हिचे मनापासून अभिनंदन. तिचे यश नवोदित खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे. तिला पुढील प्रवासासाठी आणि प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा: PM @narendramodi"

 

* * *

सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316298) अभ्यागत कक्ष : 9