पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी भारतीय बुद्धिबळपटूंचे केले अभिनंदन

Posted On: 28 SEP 2026 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 46 व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील यशासाठी भारतीय बुद्धिबळपटूंचे आज अभिनंदन केले.

त्यांची जिद्द आणि दृढ निर्धार अनुकरणीय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांचे यश आणखी अनेक युवांना बुद्धिबळ खेळण्यासाठी आणि खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी प्रेरित करेल, अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे. 

पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे;

"आपल्या बुद्धिबळपटूंचे अभिनंदन! त्यांची जिद्द आणि दृढ निर्धार अनुकरणीय आहे.

त्यांचे यश आणखी अनेक युवांना बुद्धिबळ खेळण्यासाठी आणि खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी प्रेरित करो."

 

* * *

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316287) अभ्यागत कक्ष : 13