पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत कुराशमध्ये महिलांच्या 78 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावल्याबद्दल पिंकी बलहारा हिचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
28 SEP 2026 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत कुराश क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पिंकी बलहारा हिचे अभिनंदन केले.
पिंकी बलहाराने संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त धैर्य आणि निर्धार दाखवला, असे पंतप्रधानांनी नमूद केले. तिने भविष्यातही यशाची नवी शिखरे सर करावीत आणि देशाचे नाव असेच उज्ज्वल करत राहावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
एक्स (X) वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले:
"आशियाई क्रीडा स्पर्धेत कुराश प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पिंकी बलहारा हिचे अभिनंदन. तिने संपूर्ण स्पर्धेत अथांग धैर्य आणि जबरदस्त निर्धार दाखवला. येणाऱ्या काळात ती यशाची नवी शिखरे गाठत राहो आणि आणखी नावलौकिक मिळवत राहो, हीच सदिच्छा: PM @narendramodi"
* * *
निलिमा चितळे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2316262)
अभ्यागत कक्ष : 8