पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी लता मंगेशकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त केले अभिवादन

Posted On: 28 SEP 2026 11:57AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. लता दीदींनी आपल्या दिव्य गायन प्रतिभेने संपूर्ण जगात भारताचे नाव उज्ज्वल केले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

त्यांनी आपल्या सुमधुर गायनाने भारताला समृद्ध तर केलेच, त्याचसोबत देशाच्या प्रगतीशी संबंधित प्रत्येक उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहन दिले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारतीय संगीत विश्वाला त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान युगानुयुगे संस्मरणीय राहील, असे त्यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे;

"आपल्या दिव्य गायन प्रतिभेने संपूर्ण जगात भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आदरणीय लता दीदींना त्यांच्या जयंतीनिमित्त सादर नमन. त्यांनी आपल्या सुमधुर गायनाने भारताला समृद्ध तर केलेच, त्याचसोबत देशाच्या प्रगतीशी संबंधित प्रत्येक उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय संगीत विश्वाला त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान युगानुयुगे संस्मरणीय राहील."

 

* * *

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315839) अभ्यागत कक्ष : 12