पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅश च्या पुरुष एकेरीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून अभय सिंग यांचे अभिनंदन

Posted On: 27 SEP 2026 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज आशियाई क्रीडा स्पर्धेत  स्क्वॅश च्या पुरुष एकेरीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल अभय सिंग यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की, आपले कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी भारताचा अभिमान वाढवला आहे. हे यश त्यानीं गेल्या काही वर्षांत केलेल्या अथक परिश्रमांचे फलित आहे. मोदी यांनी त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या.

एक्स या समाजमाध्यमावर एका टिप्पणीमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे :

"आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅश च्या पुरुष एकेरीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल @abhaysinghk98 यांचे मनापासून अभिनंदन! त्यांच्या कौशल्याने आणि जिद्दीने भारताचा अभिमान वाढवला आहे. हे यश त्यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या अथक परिश्रमांचे फलित आहे. त्यांना  पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा: PM @narendramodi"

 

* * *

सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315679) अभ्यागत कक्ष : 5