गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारंभाचे उद्घाटन

Posted On: 27 SEP 2026 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2026

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित उद्घाटन सोहळ्याला संबोधित केले. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

सभेला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, पूज्य अशोकजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी येथे उपस्थित राहणे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. ते म्हणाले की, त्यांचा जन्म शंभर वर्षांपूर्वी झाला आणि ते त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आदर्श राहिले. एक विद्यार्थी म्हणून त्यांनी प्राविण्य मिळवले; एक स्वयंसेवक म्हणून त्यांनी प्राविण्य मिळवले; आणि एक प्रचारक म्हणून त्यांनी स्वतःला वेगळे सिद्ध करणे सुरूच ठेवले. जेव्हा त्यांना विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत हिंदुत्वासाठी समर्पित जीवन जगणे सुरू ठेवले आणि आपल्या प्रवासात यश मिळवले. अशा व्यक्ती क्वचितच पाहायला मिळतात.

शाह म्हणाले की, जेव्हा संघर्षाचा विषय येतो, तेव्हा अशोकजी त्यांच्या संघर्षाच्या भावनेसाठी सर्वांना आठवतात. राम जन्मभूमी चळवळ त्यांच्या मनात आणि हृदयात खोलवर रुजलेली होती. गुलामीचा कलंक पुसून आणि भव्य राम मंदिराची उभारणी करूनच भारत जगात गौरव आणि प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करू शकतो, असा त्यांचा ठाम विश्वास होता . त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राम जन्मभूमी चळवळीसाठी समर्पित केले.

शाह पुढे म्हणाले की, अशोकजी यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात कोणताही फरक नव्हता. त्यांनी देशासाठी जगण्याचा मंत्र आत्मसात केला होता आणि आपले वैयक्तिक आयुष्य या तत्त्वात पूर्णपणे सामावून घेतले होते. त्यांनी संघटनात्मक कार्य ही एक प्रकारची साधना म्हणून स्वीकारली होती.

   

 

* * *

सुषमा काणे/नितीन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315674) अभ्यागत कक्ष : 8