पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरी टेबल टेनिस प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल मानुष शाह आणि दिया चितळे यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 26 SEP 2026 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदक पटकावल्याबद्दल मानुष शहा आणि दिया चितळे यांचे अभिनंदन केले.

या पदकामुळे भारतातील टेबल टेनिसच्या वाढत्या लोकप्रियतेत आणखी एक अभिमानास्पद क्षण जोडला गेला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.  त्यांनी दोघांनाही भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या जिद्दीमुळे अनेक युवा खेळाडूंना या खेळाकडे वळण्याची आणि उंच ध्येय बाळगण्याची प्रेरणा मिळेल, असेही मोदी यांनी अधोरेखित केले.

X वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे,

"आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल मानुष शहा आणि दिया चितळे यांचे अभिनंदन!

हे पदक भारतातील टेबल टेनिसच्या वाढत्या लोकप्रियतेत आणखी एक अभिमानास्पद क्षण जोडणारे आहे. त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

त्यांची जिद्द अनेक युवा खेळाडूंना या खेळाचा स्वीकार करण्यासाठी आणि उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करेल: PM @narendramodi”

 

* * *

माधुरी पांगे/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315416) अभ्यागत कक्ष : 9