पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स सांघिक क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल तिलोत्तमा सेन, विदर्षा विनोद कोचलुमकल आणि आशी चौकसी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
26 SEP 2026 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2026
भारताच्या तिलोत्तमा सेन, विदर्षा विनोद कोचलुमकल आणि आशी चौकसी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स सांघिक क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले आहे. या खेळाडूंनी अचूक नेमबाजीचे दर्शन घडवले असा गौरवपूर्ण उल्लेखही पंतप्रधानांनी केला आहे.
या यशासाठी त्यांचे अभिनंदन करत, त्यांनी असेच अधिकाधिक यश मिळवावे अशी सदिच्छाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात X या समाजमाध्यमावर पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केलेला संदेश :
“तिलोत्तमा सेन, विदर्षा विनोद कोचलुमकल आणि आशी चौकसी यांचे अचूकतेचे उत्तम प्रदर्शन !
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल या सर्वांचे अभिनंदन.
आगामी काळात त्यांना असेच अधिकाधिक यश मिळत राहो हीच सदिच्छा :
PM @narendramodi”
* * *
राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315399)
अभ्यागत कक्ष : 7