पंतप्रधान कार्यालय
महामहिम शेख अहमद बिन रशीद अल मकतूम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
21 SEP 2026 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहिम शेख अहमद बिन रशीद अल मकतूम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. दुबईचे राजघराणे आणि तिथल्या जनतेप्रती आपल्या संवेदना व्यक्त करताना मोदी म्हणाले की, महामहिम शेख अहमद बिन रशीद अल मकतूम यांनी समाजसेवेसाठी केलेले प्रयत्न भावी पिढ्या सदैव स्मरणात ठेवतील.
मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट केले:
महामहीम शेख अहमद बिन रशीद अल मकतूम यांच्या निधनामुळे अतिशय दुःख झाले आहे. समाजसेवेचे त्यांचे कार्य भावी पिढ्या सदैव स्मरणात ठेवतील.
मी दुबईचे राजघराणे आणि तेथील जनतेप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.
@HHShkMohd
निलिमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313232)
अभ्यागत कक्ष : 11