पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले नेमबाज इलावेनिल वलारिवनचे अभिनंदन

Posted On: 20 SEP 2026 5:00PM by PIB Mumbai

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमबाज इलावेनिल वलारिवान हिचे अभिनंदन केले आहे. भारतीय नेमबाज अभिमानास्पद कामगिरी करत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"भारतीय नेमबाजांची आपल्या देशाला अभिमानास्पद वाटणारी कामगिरी सुरुच आहे!

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल इलावेनिल वलारिवान हिचे हार्दिक अभिनंदन. आजच्याच दिवशी मिळालेले हे तिचे दुसरे पदक असल्याने हा विजय अधिकच खास ठरतो. तिच्या पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi"

***

नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2312719) अभ्यागत कक्ष : 15