पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे पंतप्रधानांनी मानले आभार

Posted On: 17 SEP 2026 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले आहेत. कोट्यवधी देशवासीयांच्या प्रतिभा आणि परिश्रमाच्या बळावर देश आज विकासाचे नवनवे मापदंड प्रस्थापित करत आहे आणि भारताला आणखी शक्तिशाली, समृद्ध आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे मोदी यांनी नमूद केले.

मोदी यांनी X वर पोस्ट केले:

“आपल्या स्नेहपूर्ण संदेशाबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मनःपूर्वक आभार. आपण व्यक्त केलेल्या भावना माझ्यासाठी अत्यंत मोलाच्या आहेत.

कोट्यवधी देशवासीयांच्या प्रतिभा आणि परिश्रमाच्या बळावर देश आज विकासाचे नवनवे मापदंड प्रस्थापित करत आहे. त्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद यांच्या बळावर भारताला आणखी सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही पूर्ण निष्ठेने कटिबद्ध आहोत.

@ombirlakota”

राधिका अघोर/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2311714) अभ्यागत कक्ष : 6