आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिसूचीत औषधे एच, एच1 तसेच इतर औषधांवरील देखरेखीवरील नियंत्रण अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने औषध नियम, 1945 मध्ये सुधारणा केल्या प्रस्तावित
पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी वैद्यकीय दुकानांमध्ये सीसीटीव्ही निगराणी अनिवार्य करण्याचा प्रस्ताव
Posted On:
17 SEP 2026 9:37AM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, अधिसूचित (शेड्यूल) एच, एच1 आणि एक्स औषधांच्या देखरेखीवरील नियंत्रण मजबूत करण्याच्या उद्देशाने, दिनांक 8 सप्टेंबर 2026 च्या राजपत्र अधिसूचना मसुदा जी.एस.आर. G.S.R. 791 (E) द्वारे, औषध नियम, 1945 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
या प्रस्तावित सुधारणेद्वारे अधिसूचित H, H1 आणि X औषधे अनधिकृतपणे उपलब्ध असणे आणि त्यांच्या विक्रीशी संबंधित प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अतिरिक्त नियामक सुरक्षा उपाय म्हणून वैद्यकीय दुकानांमध्ये सीसीटीव्ही निगराणी अनिवार्य करण्याचीही शिफारस केली आहे. या प्रस्तावावर सुरुवातीला औषध सल्लागार समिती (DCC) द्वारे विचारविनिमय करण्यात आला आणि त्यानंतर तो औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या (DTAB) सदस्यांमध्ये विचारविनिमयासाठी पाठवण्यात आला. प्रस्तावावर विचार केल्यानंतर, औषध तांत्रिक सल्लागार नियामक मंडळाने (DTAB) त्यांच्या मंजुरीची शिफारस केली आहे.
अंमलबजावणी झाल्यानंतर, या प्रस्तावित सुधारणेमुळे शेड्यूल्ड H, H1 आणि X औषधांची विक्री आणि वितरणावरील देखरेख अधिक मजबूत होण्यास आणि डाॅक्टरांच्या वैध चिठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) त्यांची उपलब्धता आणि अनधिकृत विक्री रोखण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
प्रस्तावित सीसीटीव्ही निगराणी यंत्रणेमुळे औषध पुरवठा साखळीमध्ये पारदर्शकता येईल आणि उत्तरदायित्व वाढेल, परिणामी सार्वजनिक आरोग्यासाठीची सुरक्षा अधिक मजबूत होईल.
मंत्रालयाने या प्रस्तावित सुधारणांवर नागरिकांकडून हितधारक सूचना आणि आक्षेप मागवले आहेत. काही आक्षेप किंवा सूचना असल्यास, त्या अवर सचिव (औषधे), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, यू-6, वर्क हॉल-सी विंग, पहिला मजला, कर्तव्य भवन-1, नवी दिल्ली-110001, या पत्त्यावर पाठवाव्यात किंवा drugsdiv-mohfw[at]gov[dot]in या ईमेलवर पाठवाव्यात असे आवाहन केले आहे.
ही अधिसूचना पुढील लिंकद्वारे पाहता येईल: https://egazette.gov.in/(S(ypsv3ntrb4ngmjg0wdnihog4))/ViewPDF.aspxखालील:
***
NitinFulluke / SampadaPatgaonkar / DineshYadav
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
/ औषध नियंत्रण अधिसूचना बदल1945/17(Amendments to Drug Rules 1945/17) सप्टेंबर 2026/2
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311205)
अभ्यागत कक्ष : 14