कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाला ‘राजभाषा उत्कृष्टता सन्मान’
Posted On:
14 SEP 2026 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2026
राजभाषेच्या अंमलबजावणीतील उत्कृष्ट कार्यासाठी आणि सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीसाठी गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाकडून दिला जाणारा ‘राजभाषा उत्कृष्टता सन्मान’ 2025-26 हा पुरस्कार नवी दिल्लीतील प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाला प्रदान करण्यात आला आहे.

14 सप्टेंबर 2026 रोजी, हिंदी दिनानिमित्त नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित, सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या सचिव निवेदिता शुक्ला वर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, राजभाषा विभागाकडून या विभागाला सलग दोन वर्षे, 2023-24 आणि 2024-25 या वर्षांसाठी प्रथम क्रमांकाचा राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

या वर्षीही, नवी दिल्ली येथील प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने राजभाषेच्या अंमलबजावणीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथम स्थान पटकावले आहे.
नियमांनुसार, जर एखाद्या मंत्रालयाला किंवा विभागाला सलग दोन वर्षे प्रथम पारितोषिक मिळाले, तर त्यांना पुढील वर्षी पुरस्कार दिला जात नाही.
मात्र, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग अनेक वर्षांपासून राजभाषेच्या क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कार्य करत आहे. त्यामुळे, विभागाच्या राजभाषेच्या अंमलबजावणीतील सातत्यपूर्ण उत्कृष्टतेची दखल घेऊन त्यांना विशेष ‘राजभाषा उत्कृष्ट सन्मान’ प्रदान करण्यात आला आहे.
माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310245)
अभ्यागत कक्ष : 10